Introduction to Ancient Indian Astronomy (भारतीय खगोलशास्त्राचा परिचय)
-
LevelAll Levels
-
Duration25 hours
What I will learn?
- तारे म्हणजे काय, ते कसे निर्माण होतात आणि विश्वाची उत्पत्ती कशी झाली?
- २७ नक्षत्रे आणि १२ राशी आकाशात ओळखण्याची पद्धत आणि त्यांचे महत्त्व
- वेदांग ज्योतिष – जगातील पहिला खगोलशास्त्रीय ग्रंथ यामधून मिळणारे आकलन
- प्राचीन भारतातील खगोलशास्त्रज्ञ आणि त्यांचे योगदान
- अयन म्हणजे काय? मकरसंक्रांती दरवर्षी पुढे का जाते? अधिक मास का येतो?
- संपात (Equinox) म्हणजे काय? वसंत संपात का महत्त्वाचा आहे?
- ध्रुवतारा बदलत का आहे? त्यामागचं कारण
- विविध भारतीय पंचांग पद्धती – चांद्र, सौर, अमांत, पौर्णिमांत
- वैदिक काळापासून आजपर्यंत भारतीय कालगणनेतील बदल
- तिथी, वार आणि पंचांगातील इतर घटक समजून घेणे
- पंचांगाच्या साहाय्याने आकाश निरीक्षण कसे करावे
- भारतीय सण-उत्सवांशी खगोलशास्त्राचा असलेला संबंध
Course Information
यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा।
तद्वद् वेदांगशास्त्राणां ज्योतिषमूर्धनि स्थितम्॥
इथे ज्योतिष म्हणजे आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या ज्योतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र होय.भारतात अगदी प्राचीन काळापासून खगोलशास्त्राचा अभ्यास होतो आहे. जसा मोराच्या डोक्यावर तुरा किंवा नागाचा मणी तसे खगोलशास्त्र हे सर्व शास्त्रांमध्ये अग्रभागी आहे असे आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे.
- तारे म्हणजे काय ? ते कसे जन्माला येतात ?विश्वाची उत्पत्ती कशी झाली
- २७ नक्षत्र , बारा राशी आकाशात नेमके कुठे आहेत आणि ते कसे ओळखावे?
- जगातील पहिल्या खगोलशास्त्रीय ग्रंथ “वेदांग ज्योतिष” मध्ये काय आहे?
- प्राचीन भारतात कोण कोणते खगोलशास्त्रज्ञ होऊन गेलेत?
- अयन म्हणजे काय? संक्रांत पुढे पुढे का सरकते आहे अधिक महिना का येतो ?
- संपात म्हणजे काय? वसंत संपात का महत्वपूर्ण आहे?
- आपला ध्रुवतारा का बदलत आहे?
- चांद्र ,सौर,अमान्त,पौर्णिमान्त अशा अशा विविध कालगणना कोणत्या आहेत?
- वैदिक काळापासून आतापर्यंत आपली कालगणना कशी बदलत गेली?
- पंचांगातील तिथी ,वार इत्यादी अंगे काय आहेत?
- पंचांगाद्वारे आकाश निरीक्षण कसे करावे?
- आपल्या काही सण उत्सवांमध्ये खगोलशास्त्र आहे का?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्राचीन भारतीय खगोलशास्त्र – परिचय हा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो.. या वर्गात मूलभूत खगोलीय संकल्पना , भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास,भारतीय कालगणना,पंचांग परिचय ,आकाश निरीक्षण अशा विविध विषयांची ओळख होते.
Instructors
Vinay Joshi
कार्यशाळा
- अभ्यासक्रम परिचय, खगोलशास्त्राचा इतिहास, अश्मयुग पासून – गरज विविध संस्कृतींचा उदय जगभरात विकसित झालेले खगोल शास्त्र
- मूलभूत संकल्पना महत्वाचे काही तारे (ध्रुव , व्याध ,रोहिणी ,ज्येष्ठ ,अगस्त्य )
- तारे – जन्म ,आयुष्य , गुणधर्म ताऱ्यांचे वर्गीकरण – नामकरण ताऱ्यांचा आकार तुलना तार्यांची दृश्यप्रत तार्यांची अंतरे – प्रकाशवर्ष जोडतारे – प्रकार
- विश्व- तेजोमेघ – प्रकार उदाहरणे दीर्घिका – प्रकार, उदाहरणे, प्रमुख दीर्घिका, दीर्घिका समूह, विश्वाची उत्पत्ती, बिग बँग, विसावोत्पत्तीच्या इतर संस्कृतीतील कल्पना, भारतीय संकल्पना विश्वातील आपले स्थान
- खगोलीय संकल्पनातारकासमूह ( प्रकार , वर्गीकरण , ताऱ्यांचे नावे), निरिक्षणीय खगोलशास्त्र संकल्पना
- खगोल, क्षितिज, खमध्य, खगोलीय विषुववृत्त,आयनिक वृत्त, होरा, क्रांती, दृश्यप्रत, वसंत संपात, शरद संपात अयन, विषुव आणि अयन दिन
- राशी (आकाशातील स्थान,तारे,कथा), नक्षत्रे (२७ नक्षत्रांचे आकाशातील स्थान ,योगतारे,कथा) राशिप्रवेश
- पृथ्वी विषयक माहिती, कक्षा -अपसूर्य उपसूर्य, कललेला अक्ष,पृथ्वीच्या गती – परांचन गती, अक्षांश-रेखांश विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त
- भारतीय खगोलशास्त्र, प्रागैतिहासिक काळ, सिंधू- सरस्वती वैदिक काळ, वेदांग, ज्योतिष काळ, रामायण – महाभारत यातील खगोलशास्त्रीय उल्लेख, पुराणातील खगोल शास्त्रीय उल्लेख, संस्कृत साहित्यातील उल्लेख, – कालिदास सिद्धांत, पंचक काळ
- आर्यभट,वराहमिहिर,भास्कराचार्य, भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका
- पंचांग पंचांगाचे प्रकार – सायन निरयन, सौर चांद्र -सौर पंचांगाचे घटक, तिथी, वार, योग, नक्षत्र, करण,पंचांगाद्वारे आकाश निरीक्षण
English Description
“Just as a peacock’s crest and a serpent’s gem stand out, astronomy holds the highest place among all sciences.”
In this verse, Jyotish (Astronomy) refers to the study of celestial bodies such as the Sun, Moon, stars, and planets. India has been studying astronomy since ancient times. Our ancestors believed that just as a peacock’s crest or a serpent’s gem is unique, astronomy is the most distinguished among all sciences.
To explore fascinating topics, the “Introduction to Ancient Indian Astronomy” course has been designed. This course provides a basic understanding of astronomical concepts, the history of Indian astronomy, Indian timekeeping systems, Panchang studies, and sky observation techniques.
Syllabus
- Introduction to the Course
-
- History of Astronomy: From the Stone Age to the modern era
- Need for astronomy and its development across various cultures worldwide
- Fundamental Concepts
-
- Important stars: Polaris (Dhruva), Sirius (Vyadha), Aldebaran (Rohini), Antares (Jyeshtha), Canopus (Agastya)
- Stars
-
- Birth, lifespan, and characteristics of stars
- Classification and naming of stars
- Comparison of star sizes
- Apparent magnitude and distances of stars (light-years)
- Binary stars and their types
- Universe
-
- Nebulae – Types and examples
- Galaxies – Types, examples, major galaxies, and galaxy clusters
- Origin of the Universe:
- Big Bang Theory
- Other cosmological concepts from different cultures
- Indian cosmological perspectives
- Our place in the universe
- Astronomical Concepts
-
- Constellations – Types, classification, and star names
- Observational Astronomy
- Celestial Concepts
-
- Horizon, Zenith, Celestial Equator, Ecliptic, Hour Angle, Declination, Apparent Magnitude
- Vernal Equinox, Autumnal Equinox, Solstices, and Equinox Days
- Zodiac Signs & Nakshatras (Lunar Mansions)
-
- Location of zodiac signs in the sky, their stars, and associated mythological stories
- 27 Nakshatras – Their positions, significant stars, and legends
- Zodiac transitions
- Earth & Its Motion
-
- Earth’s orbit – Aphelion and Perihelion
- Tilted axis of Earth
- Earth’s motions – Rotation, Precession
- Latitude & Longitude, Equator, Tropic of Cancer, Tropic of Capricorn
- Indian Astronomy
-
- Prehistoric Astronomy
- Indus-Saraswati Civilization & Vedic Period
- Vedanga Jyotisha (Ancient Indian Astronomy)
- Astronomical references in the Ramayana & Mahabharata
- Astronomical references in the Puranas & Sanskrit Literature
- Kālidāsa’s Astronomical Theories
- Panchaka Period (Five-Year Cycle)
- Great Indian Astronomers
-
- Aryabhata, Varahamihira, Bhaskaracharya
- Indian National Solar Calendar
- Panchang (Hindu Calendar)
-
- Types of Panchang – Sidereal & Tropical, Solar & Lunar-Solar Calendars
- Elements of Panchang – Tithi (Lunar Day), Vara (Weekday), Yoga, Nakshatra, Karana
- Using Panchang for astronomical observations
Marathi Description
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- अभ्यास साहित्य - सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF Format मध्ये दिल्या जातील.
- रेकॉर्डिंग - प्रत्येक सत्राचे रेकॉर्डिंग पुढील २ महिने पाहण्याची सोय.
Requirements
- आयोजक - स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब
- कोठे - झूम वर ऑनलाईन
- दिनांक - सुरुवात २ फेब्रुवारी २०२६ पासून
- दिवस - दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार
- कालावधी - सुरुवात २ फेब्रुवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६
- वेळ - सायंकाळी ७:०० ते ८:००
- शुल्क - रुपये २५०० फक्त
Target Audience
- 15 years and above
Leave a Review
Good and Unique initiative. Please keep it up.
Good and Unique initiative. Please keep it up.
ज्ञानवर्धक,अतिशय सुंदर सादरीकरण
ज्ञानवर्धक,अतिशय सुंदर सादरीकरण, अभ्यासपूर्ण विवेचन आदी अनेक अंगाने परिपूर्ण असा सुंदर अभ्यासक्रम आहे.
मनापासुन आभार
“अगदी सोप्या भाशेत या गहन विशया ची ओलख करून
दील्या बद्दल मनापासुन आभार !!”
वर्गातून अनेक नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या.spreading knowledge या प्लॅटफॉर्म मुळे खरच खूप मदत झाली आहे.
हे सत्र मी उत्सुकतेपोटी करायचे ठरवले होते. परंतु या वर्गातून अनेक नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या… तसेच मानवी मनाला जे सामान्यपणे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे या वर्गातून मिळाली. कुतूहलापोटी केलेला हा अभ्यासक्रम अतिशय सुंदर रित्या पूर्ण झाला आहे. अशा गोष्टी शिकायची इच्छा तर बऱ्याच जणांची असते. परंतु काही कारणास्तव आणि इतर कामामुळे वेळ भेटत नाही.. पण या सत्रामुळे आणि spreading knowledge या प्लॅटफॉर्म मुळे खरच खूप मदत झाली आहे. असेच अनेक नवीन उपक्रम आम्हाला अजून करायला मिळतील ही आशा व्यक्त करते. आणि आपणास शुभेच्छा देते. धन्यवाद!
अभ्यासक्रम अत्यंत उत्कृष्ट होता.
अभ्यासक्रम अत्यंत उत्कृष्ट होता. श्री. विनय जोशी सरांचे खगोल शास्त्राविषयीचे ज्ञान आणि शिकवण्याची पद्धत खूप छान !!
श्री पौरस सर sprading knowledge चा उपक्रम खूप छान आ
“श्री पौरस सर sprading knowledge चा उपक्रम खूप छान आहे,जे जे आपणासी ठावे ते इतरांना शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन,याप्रमाणे तुमचे काम आहे.व श्री विनय सर यांचा विषयावरील अभ्यास खूप छान आहे, शिकवण्याची हातोटी विलक्षण आहे, शंकां चे निरसन करण्यासाठी वेळ देतात, अभ्यासक्रमात सहभागी झाल्या मुळे बरीच माहिती मिळाली, अर्थात अजूनही क्लास सुरूच रहावा असेच वाटत होते.खूप खूप धन्यवाद.
असेच विविध विषयांवरील अभ्यासक्रम सुरू ठेवावेत, जेणेकरून त्या त्या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल,नक्कीच सर्वांना त्याचा लाभ होईल.धन्यवाद.🙏”
अतिशय अभ्यासपूर्ण आणि शिस्तशीर पद्धतीने हा वर्ग घेतला गेला
अतिशय अभ्यासपूर्ण आणि शिस्तशीर पद्धतीने हा वर्ग घेतला गेला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद
खगोलशास्त्र हा अभ्यासक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने व सोप्या पद्धतीने समजावून सांगितला
खगोलशास्त्र हा अभ्यासक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने व सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. लहानपणापासून आकाश निरीक्षण करायचीआवड आहे व अनेक नक्षत्र मी पाहत होते. परंतु त्याचा वेगळा पद्धतीने अभ्यास करावयास मिळाला त्याचप्रमाणे अनेक संकल्पना नव्याने शिकायला मिळाल्या. विनय सर व मटाचे प्रामुख्याने आभार.
कमी वेळात जास्त knowledge असा spreading knowledge चा हातखंडा आहे.
आपले कोर्सेस खूपच छान असतात. कमी वेळात जास्त knowledge असा spreading knowledge चा हातखंडा आहे.
Sessions were very interesting,
Sessions were very interesting, Got insight on how to observe sky with different curiosity and many thanks to Vinay Sir
