Introduction to Dasbodh (ओळख दासबोधाची)
-
LevelAll Levels
-
Duration12 hours
What I will learn?
- भक्तीचे नऊ प्रकार
- आदर्श व्यक्ती, कुटुंब आणि समाज
- संघटन व व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान
- चातुर्य, नेतृत्वगुण आणि ध्येय निश्चिती
- समर्थ रामदासांचे वाङ्मयीन योगदान आणि ११ मारुती, जांब, टाकळी यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे
Course Information
समर्थ रामदास यांनी १७व्या शतकात रचलेला दासबोध कालातीत असून, आजच्या काळातही तो तेवढाच परिपूर्ण वाटतो. दासबोधाच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी समाजाला सुस्पष्ट उपदेश दिला आहे. ‘दासबोध’ हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अनमोल लेणे आहे. आधुनिक जगात कसे वागावे हे सांगणारा एक उत्तम ग्रंथ म्हणजे दासबोध.
याच दासबोधाची ओळख आणि पर्यायाने जीवनाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या ग्रंथाची माहिती प्रत्येकाला व्हावी, म्हणून ‘ओळख दासबोधाची’ हा अभ्यासक्रम आयोजित केला जातो.
सदर अभ्यासक्रमामध्ये दासबोधातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाईल. नऊ भक्तींचे विवेचन, आदर्श व्यक्ती, आदर्श कुटुंब, आदर्श समाज, संघटनशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, चातुर्य, नेतृत्वगुण, आदर्श नेता, ध्येय निश्चिती यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातील. तसेच समर्थांचे वाङ्मयीन कार्य आणि ११ मारुती, जांब, टाकळी यांसारख्या समर्थांशी निगडित महत्त्वाच्या स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाईल.
हा अभ्यासक्रम सर्व वयोगटांसाठी खुला असून, प्रत्येकाने करावा असाच आहे. कारण रोजच्या जीवनातील अनेक प्रश्न ‘दासबोधा’मुळे सहजगत्या सोडवता येतात. तसेच लोकांशी, कॉर्पोरेट क्षेत्रात, नोकरी करताना किंवा व्यवसाय करताना कसे वागावे याचे मार्गदर्शन देखील हा ग्रंथ करतो. आधुनिक जगात आदर्श व्यक्तिमत्त्व कसे घडवावे हे शिकवणारा ग्रंथ म्हणजे ‘दासबोध’.
Instructors
Pro. Dr.Vimukta Raje
कार्यशाळा
सत्र १: दासबोध परिचय
दासबोध स्वरूप, रचना,कालखंड, दासबोधामागील हेतू
सत्र २: दासबोधातील भक्तीयोग
श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेद,या नऊ भक्तींचे विवेचन, सद्भक्त लक्षणे
सत्र ३: दासबोधातील कर्मयोग
व्यक्तीचे परिवर्तन होऊन, आदर्श कुटुंब, आदर्श समाज, आदर्श राष्ट्र तयार करणे हा समर्थांचा कर्मयोग
सत्र ४: दासबोधातील ज्ञानयोग
ज्ञानमार्गातील पंजीकरण,माया ब्रह्म, दृष्टी निरसन, अंत:करण पंचक, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय शुद्धज्ञान, आत्मनिवेदन, आत्मबोध यावर विवेचन
सत्र ५: दासबोधातील संवादशास्त्र
उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, शब्दब्राहम निर्माण करणे., दृक – श्राव्य नाट्य यांचा उत्तम प्रयोग, वक्तृत्व सांगणारे शास्त्र.
सत्र ६: दासबोधातील मानसशास्त्र
कसे वागावे?, कोणते शब्द कोठे वापरावेत?, धीर कसा धरावा?, रागावर नियंत्रण कसे ठेवावे?, ताणताणावाचे व्यवस्थापन, मन ताब्यात कसे ठेवावे सांगणारे शास्त्र.
सत्र ७: दासबोधातील व्यवस्थापनशास्त्र
जीवनात व्यवस्थापन का आवश्यक, कार्य तत्परता, ध्येय निश्चिती, चातुर्य, मनुष्य कसा ओळखावा?
नेतृत्व कसे करावे?, सोबत काय करू नये हे सांगणारे व्यवस्थापन शास्त्र
सत्र ८: समर्थाचे संघटन शास्त्र
संघटन कसे करावे, संघटन का आवश्यक, समर्थ संप्रदाय स्थापना, समर्थ संप्रदाय संघटनामागील विचार, समाज सापेक्ष विचार
सत्र ९: समर्थांनी सांगितलेले उत्तम नेतृत्व
नेतृत्व रचना,परिभ्रमण ,अखंड विवेक ,प्रयत्नवाद ,नि:स्पृहता ,मृदुवचने,क्षमाशील ,लोक नेता,आदर्श नेत्ता
सत्र १०: समर्थाचे वाङ्मयीन कार्य
मनाचे श्लोक, आरत्या, करुणाष्टके, पत्रे, रामायणे, स्फुट काव्ये, सामर्थ्यांचे सामर्थ्य
सत्र ११: समर्थ रामदास संबंधित महत्वाची स्थळे
जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड, ११ मारुती, वाग्देवता मंदिर
सत्र १२: समर्थांचे वेगळेपण
चरित्र, दैवते, संप्रदाय, तत्त्वज्ञान, साहित्य, शैली, संत, राष्ट्रचिंतक, सुसंवादक, सुसंघटक, व्यवस्थापक, समुपदेशक
English Description
Dasbodh, written by Samarth Ramdas in the 17th century, is timeless and remains just as relevant today. Through this scripture, Samarth Ramdas provides clear and insightful guidance to society. Dasbodh is a priceless treasure of Marathi literature, offering deep philosophical reflections on various subjects. It serves as a practical guide for navigating the modern world.
To introduce everyone to Dasbodh and its life lessons, this course, “Introduction to Dasbodh,” has been designed.
This course is open to all age groups and highly recommended for everyone. Dasbodh provides solutions to everyday challenges and guides people on how to interact in personal, corporate, and business environments. It also teaches how to develop an ideal personality in today’s world.
Syllabus
Session 1: Introduction to Dasbodh
- Nature, structure, time period, and purpose of Dasbodh
Session 2: Bhakti Yoga in Dasbodh
- Discussion on the nine forms of devotion: Shravana (listening), Kirtana (singing), Nama Smarana (chanting), Pada Sevana (serving), Archana (worship), Vandana (bowing), Dasya (servitude), Sakhya (friendship), and Atmanivedana (self-surrender)
- Characteristics of a true devotee
Session 3: Karma Yoga in Dasbodh
- Samarth Ramdas’ concept of Karma Yoga: Transforming individuals to create an ideal family, ideal society, and ideal nation
Session 4: Dnyan Yoga in Dasbodh
- Analysis of the path of knowledge, illusion vs. Brahman, elimination of perceptional errors, inner consciousness, sense organs, organs of action, pure knowledge, self-surrender, and self-realization
Session 5: Science of Communication in Dasbodh
- Qualities of an excellent speaker and listener
- The power of words (Shabda Brahma)
- Effective use of visual and auditory theatrical expressions
- The principles of oratory
Session 6: Psychology in Dasbodh
- How to behave?
- Which words to use in different situations?
- How to remain patient?
- How to control anger?
- Stress management
- How to gain control over the mind?
Session 7: Management Science in Dasbodh
- Why is management essential in life?
- Work efficiency, goal setting, intelligence, and understanding people
- Leadership skills
- What should and should not be done in leadership?
Session 8: Samarth’s Organizational Science
- How to organize and why it is necessary?
- Establishment of the Samarth sect
- Thought process behind the organization of the Samarth sect
- Socially relevant thoughts
Session 9: Samarth’s Teachings on Leadership
- Leadership structure
- Travel and outreach
- Constant awareness and wisdom
- Philosophy of effort
- Detachment, politeness, forgiveness
- Qualities of an ideal leader
Session 10: Literary Contributions of Samarth Ramdas
- Manache Shlok (Verses for the Mind)
- Aartis, Karunastakas (hymns of compassion), letters, Ramayana, spontaneous poetry
- The power of Samarth’s literature
Session 11: Important Places Related to Samarth Ramdas
- Jamb, Takli, Chafal, Shivtharghal, Sajjangad, 11 Maruti temples, Vagdevata Temple
Session 12: The Uniqueness of Samarth Ramdas
- His life, deities, sect, philosophy, literature, writing style
- His role as a saint, national thinker, great communicator, organizer, administrator, and counselor
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher.
Requirements
- Venue: Zoom (Online)
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
Target Audience
- 14 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
