Kalidas literature (कालिदास यांचे वाड्मय)

1,200.00 2,500.00

What I will learn?

  • मेघदूत आणि ऋतुसंहार या संस्कृत काव्यांचे वाचन आणि अर्थ समजून घेणे
  • कालिदासांच्या काव्यशैलीचे सौंदर्य आणि त्यांची साहित्यिक प्रतिभा अनुभवणे
  • श्लोकांचे अर्थविवेचन करून त्यांच्या भावार्थाचा अभ्यास करणे
  • निसर्गाच्या बदलत्या रूपांचे वर्णन आणि ऋतूंचा प्रभाव समजून घेणे
  • "उपमा कालिदासस्य" या उक्तीचे महत्त्व आणि त्याचा वापर समजून घेणे
  • संस्कृत काव्यरचनेची रचना आणि सौंदर्य अनुभवणे

Course Information

महाकवी कालिदास विरचित “मेघदूतम्” 

  “आषाढस्य प्रथम दिवसे..!”

 

“पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:|

अद्यापि ततुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव ||”

 

उपरोक्त श्लोकाचा अर्थ असा की,पूर्वी कवींचे मोजमाप करत असताना स्वाभाविक प्रथम बोटावर म्हणजेच कनिष्ठिकेवर महाकवी कालिदासांचे नाव घेतले गेले पण पुढे काय?त्यापेक्षा मोठ्या बोटावर त्यांच्यापेक्षा मोठे नाव हवे पण ते आजवर मिळालेच नाही. त्यामुळे दुसरे बोट ‘अ-नामिका’ चं राहिले. ही महाकवींची सर्वोच्चता. यात संस्कृत साहित्याला जी काही कवींची, नाटककारांची परंपरा लाभली आहे त्यात कालिदासांचं नाव अग्रणी आहे. त्यांनी लिहिलेल्या सप्तकलाकृती म्हणजे सप्तरंगी इंद्रचापच आहे. त्यातलीच एक अजरामर कलाकृती म्हणजे “मेघदूतम” ही. तसं तर हे खंडकाव्य आहे. पण प्रत्येक संस्कृतप्रेमी असणाऱ्या व्यक्तीचं मन आधी धाव घेतं ते मेघदूताकडे. वैशाख वणवा पेटल्यावर शरीराची काहिली शमवण्यासाठी निसर्गाने वर्षा ऋतूची तरतूद केली. आणि त्याच ऋतूसमवेत मनातील सृजनशीलता जागी होते ती आषाढ महिन्यामुळे.

 

आषाढ महिना म्हंटला की सर्वप्रथम ओठी येतं ते महाकवि कालिदास यांनी रचलेलं “मेघदूत” 

कालिदासाच्या सप्तकलाकृतींपैकी जास्तीत जास्त अजरामर ठरलेली कलाकृती म्हणजे “मेघदूत” 

या संस्कृत काव्याने साहित्यविश्वातील अनेक कवी कवयित्रींना मोहिनी घातली आणि त्यांनी या मेघदूताचे समश्लोकी काव्य तयार केले. ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके त्यांच्या अनुवादात लिहितात –

 

“ कुबेरसेवक यक्ष एक कुणि सेवेमाजीं अपुल्या चुकला 

प्रियावियोगें अधिकच दुःसह वर्षाचा त्या शाप मिळाला 

जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथें जलाशय 

घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमीं घेई आश्रय”

 

त्याच अजरामर अशा मूल संस्कृत मेघदूताची अनुभूती आपण घेणार आहोत. 

कुठलंही काव्य इतके काळ कसं काय आपल्या मनावर अधिराज्य गाजवू शकतं? नेमकं काय आहे त्यात? का प्रत्येक व्यक्ती त्या काव्याच्या प्रेमात पडतो? कशामुळे भुरळ पडते आपल्याला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या कोर्समध्ये जाणून घेणार आहोत ती सुद्धा मेघदूताच्या सहाय्याने…!

आपण मेघदूत कसे शिकणार आहोत? 

 

१. मूळ संस्कृत काव्याचे वाचन 

२.पूर्वमेघ आणि उत्तरमेघ यातील रचनासौंदर्य

३. श्लोकांचे अर्थविवेचन 

४.कालिदासांची काव्यप्रतिभा 

५.मेघदूतातील प्राकृतिक सौंदर्य 

६. “उपमा कालिदासस्य” या उक्तीची यथार्थता.

७.मेघमार्गाचे अत्यंत मनोहारी दर्शन 

८.अलकानगरीची संपन्नता आणि श्रीमंती 

९.उत्तम काव्यरचनेची प्रचिती.

 

महाकवी कालिदास विरचित “ऋतुसंहारम्” 

कालिदासांच्या सप्तकलाकृतींमध्ये समाविष्ट असलेले दुसरे खंडकाव्य म्हणजे “ऋतुसंहारम्” होय. ग्रीष्म, वर्षा,शरद,हेमंत,शिशिरआणि वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत. प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदासांनी नोंदविले आहेत.  साधी परंतु अनुप्रासयुक्त भाषा हे या काव्याचे वैशिष्ट्य मानले जाते.

 

आपण ऋतुसंहार कसे शिकणार आहोत? 

 

१. मूळ संस्कृत काव्याचे वाचन 

२. श्लोकांचे अर्थविवेचन 

३.कालिदासांची काव्यप्रतिभा 

४.काव्यातील ऋतुंचे अप्रतिम वर्णन. 

५. “उपमा कालिदासस्य” या उक्तीची यथार्थता.

६. ऋतुपरत्वे निसर्गात होणारे सुंदर बदल.

 ७.उत्तम काव्यरचनेची प्रचिती.

Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)

Material Includes

  • Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher.

Requirements

  • Venue: Zoom (Online)
  • Language of Instruction: Marathi
  • Prerequisite: Knowledge of Marathi language

Target Audience

  • 14 years and above
Leave a Review

There are no reviews yet. Be the first one to write one.