Marathi Shuddhlekhan (मराठी शुद्धलेखन)
-
LevelAll Levels
-
Duration6 hours
-
Last UpdatedApril 9, 2025
What I will learn?
- मराठी शुद्धलेखन नियमांचे महत्त्व समजून घेणे
- १८ मुख्य नियम आणि ४० ते ५० उपनियम शिकणे
- लेखनातील अचूकता आणि नेमकेपणा वाढवणे
- लेखन नियम लक्षात ठेवण्यासाठी स्मरणतंत्राचा उपयोग करणे
- सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने ज्ञान मिळवणे
- सरावासाठी प्रात्यक्षिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे
- योग्य शब्दलेखन व व्याकरण नियम शोधण्यासाठी मार्गदर्शन मिळवणे
- भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या व्याकरणाच्या पुस्तकांचा संदर्भ मिळवणे
- गोंधळ आणि गैरसमज टाळण्यासाठी चुका टाळणे
- संवाद कौशल्य वाढवण्यासाठी लेखन नियम अचूकपणे वापरणे
Course Information
कोणत्याही भाषेच्या लेखनाचे नियम असतात. तसे ते आपल्या मराठी भाषेच्या लेखनाचेसुद्धा नियम आहेत . त्याला प्रमाण लेखनाचे नियम असे म्हणतात. आपण आपला व्यवहार जर प्रमाण मराठीमधून करू इच्छित असाल, आपले विचार आपल्या भावना मराठीमधून मांडू इच्छित असाल, तर आपल्याला मराठीचे लेखन नियम माहीत असायला हवेत. मराठी प्रमाण लेखनाचे 18 नियम आणि त्याचे उपनियम असे मिळून साधारण चाळीस-पन्नास नियम जर आपल्याला माहीत असतील तर आपले लेखन अतिशय अचूक आणि नेमके होऊ शकते. या कार्यशाळेमध्ये हे नियम अत्यंत सोप्या शब्दात उलगडून दाखवले जाते. शिवाय हे नियम लक्षात ठेवण्यासाठी काही कानमंत्रसुद्धा दिले जातील. स्प्रेडिंग नॉलेज अंतर्गत या कार्यशाळेतून आजवर अनेक विद्यार्थ्यांनी हे नियम जाणून घेतले आहेत. केवळ विद्यार्थी नव्हे तर शिक्षक, लेखक, पत्रकार, ब्लॉग राईटर, सोशल मीडियावर व्यक्त होऊ इच्छिणारे हौशी लोक तसेच स्पर्धापरीक्षा देऊ इच्छिणारे या सगळ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.
कार्यशाळेच्या दरम्यान काही सरावसुद्धा करून घेतले जातात, शिवाय भविष्यात एखाद्या शब्द कसा लिहावा, असा प्रश्न पडल्यास तो कोठे शोधावा याचेही मार्गदर्शन केले जाते. यासाठीच्या संदर्भग्रंथांची माहिती कार्यशाळेदरम्यान दिली जाते . आपल्या रोजच्या जगण्यात आपण तेव्हा मराठीचा वापर करतो, तेव्हा त्यात अनेकदा छोट्या-मोठ्या चुका आढळतात. या चुका नेहमीच मोठा गोंधळ करीत नसतात. मात्र क्वचित प्रसंगी असा काही गोंधळ निर्माण होतो की तो निस्तरताना नाकी नऊ येतात. इतिहासात ध चा मा केल्याची गोष्ट आपणा सगळ्यांना माहीत आहेच. अशा प्रकारचे गोंधळ किंवा गैरसमज आपल्या लेखनातील चुकीमुळे निर्माण होऊ नयेत यासाठी आपण हे सारे लेखन नियम समजून घेतले पाहिजे.
या कार्यशाळेत अत्यंत सोप्या शब्दात हसतखेळत कंटाळवाणे न होता हे सारे नियम शिकवले जातात. या विषयात रुची निर्माण होईल अशाप्रकारे या विषयाकडे कसे पहावे हे शिकवले जाते.
Instructors
Vaibhav Chalke
English Description
Every language has its own writing rules, and the Marathi language is no exception. These are known as Standard Writing Rules.
If you wish to conduct your daily communication in proper Marathi or express your thoughts and emotions effectively, you must be familiar with the rules of Marathi writing. There are 18 main rules of standard Marathi writing, along with sub-rules, totaling around 40 to 50 important guidelines. Knowing these can help make your writing precise and accurate.
This workshop will break down these rules in simple and easy-to-understand language. Additionally, special memory techniques will be provided to help participants remember them.
This workshop is not just for students but also for teachers, writers, journalists, bloggers, social media enthusiasts, and competitive exam aspirants.
During the workshop, participants will also engage in practical exercises, and guidance will be provided on where to look up correct spellings if they have doubts in the future. References to important grammar books will also be shared.
In everyday life, many people make small mistakes while using Marathi, and while these errors may not always cause major issues, sometimes they lead to confusion or misunderstandings. We all know the famous historical incident where a minor spelling mistake created a big misunderstanding.
To avoid errors and misinterpretations in writing, it is essential to understand and apply these Marathi writing rules correctly.
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher
Requirements
- Venue: Zoom (Online)
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
Target Audience
- 14 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
