अभ्यास महाराष्ट्रातील संतांचा (Study of Saints of Maharashtra)
-
LevelAll Levels
-
Duration30 hours
What I will learn?
- संतांची आणि संत साहित्याची ओळख करून घेणे.
- संत साहित्यातील संचित पुढील पिढीपर्यंत नेणे
- संत साहित्य हे सकारात्मक संस्कार रूजवणे.
- संत साहित्याची आणि संत विचारांची तसेच संत चरित्र्याची ओळख
- संत साहित्याचा समाजावरील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव जाणणे.
- संत साहित्यातून सकारात्मकतेचा लाभ आणि सद्गुण जोपासत व्यक्तिमत्व विकास याचा लाभ होतो.
Course Information
संत साहित्य आपल्या भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. संतांची आपल्या भारतास व महाराष्ट्रास लाभलेली परंपरा हा अध्यात्म, साहित्य व सांस्कृतिक एैतिहासिक असा फार मोठा वरदहस्त आहे. तन, मन, ज्ञान अशी ही पवित्र गंगोत्री ही महानुभव संप्रदाय, नाथसंप्रदाय, दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय असे पाच संप्रदाय आहेत. या संप्रदायातील संत वाड्.मय, कार्य चळवळी, साधना प्रणाली त्या कालखंडातील परिस्थितीचा प्रभाव हा फार मोठा इतिहास आहे.
श्री चक्रधर स्वामी, श्री दत्तप्रभू अवतार, श्री गोरक्षनाथ, श्री मच्छिंद्रनाथ, श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, संत नामदेव, संत तुकाराम आणि संत कवयित्री या सर्वांच्या सांप्रदायिक परंपरा, ज्ञान साहित्याची ग्रंथसंपदा म्हणजे समृध्द ज्ञानपरंपरा आहेत. त्यातील वैचारिक, बौध्दिक तत्वज्ञानाच्या अभ्यास विचार संशोधन व संतांच्या चारित्राचा भाग घटना (कथा) मानवास जगण्याची शक्ती देतात. हा उर्जेचा स्त्रोत मनाचे सकारात्मक परिवर्तन करतो. स्त्री संत साहित्य हे मराठी संत साहित्यातील अनमोल असे योगदान आहे. संत साहित्यात स्त्री-पुरूष असा भेद नाही. जात-पात धर्म याच्या पलिकडे जाणारे संत वाड्.मय आनंदाचे, समाधानाचे अनमोल रत्न आहे.
प्रमुख मार्गदर्शक:
- प्रा.डॉ. विमुक्ता राजे (समर्थ रामदास यांच्या साहित्यात Ph.D.)
- प्रा.डॉ. राधिका पारसनिस गुप्ते प्रमुख मार्गदर्शक (संत साहित्य, नाथसंप्रदाय मध्ये Ph.D. आणि मानद डिलीट, सेंटर अमेरिका विद्यापीठ)
| घटक | माहिती |
|---|---|
| आयोजक | स्प्रेडींग नॉलेज, महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब आणि जोशी – बेडेकर महाविद्यालय, ठाणे |
| दिनांक | दिनांक १४ जून २०२५ पासून |
| कालावधी | १.५ महिने |
| दिवस | सोमवार ते शुक्रवार |
| वेळ | सायंकाळी ८:१५ ते ९:१५ |
| ऑनलाईन स्थळ | झूम वर लाईव्ह |
| Whatsapp ग्रुप | १४ जूनला सकाळी सहभागकर्त्यांचा एक Whatsapp ग्रुप तयार केला जाईल |
| अभ्यास साहित्य | सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील |
| शुल्क | रुपये २५०० फक्त |
| प्रमाणपत्र | सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच रेकॉर्डिंग पुढील २ महिने पाहण्याची सोय |
अभ्यासक्रम:
१. संत साहित्य परिचय आणि चरित्र
२. संत ज्ञानेश्वर – पार्श्वभूमी, चरित्र, ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरीचे अंतरंग, भागवतधर्म
३. संत नामदेव – चरित्र, अभंगगाथा, तीर्थावली, आणि समाज प्रबोधन
४. संत एकनाथ – चरित्र, वाड्मय, समाज सुधारणा आणि क्रांतिकारी विचार
५. संत तुकाराम – चरित्र, तत्त्वज्ञान, समाज सुधारणा आणि अभंगरचना
६. समर्थ रामदास – चरित्र, समाज सुधारणा, ग्रंथसंपदा, राजकीय विचार आणि धर्मप्रसार
७. संत कवयित्री –
▪ संत कवयित्रींची वैशिष्ट्ये
▪ स्त्री जीवनदर्शन, वाड्मयीन कार्य
▪ मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई इत्यादी प्रमुख संत कवयित्रींच्या संदर्भात अभ्यास
८. संत साहित्यातील भक्तिमार्ग
९. कर्मयोग, हठयोग, ज्ञानयोग
१०. संत साहित्यातील राष्ट्रविचार व समाजविचार
११. लोकशाही व समानता
१२. लोकपरंपरा व भाषा
१३. संत साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक संचित
१४. संत साहित्यातील मानवी मन व शिकवण
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Study Material: All participants will be provided notes in PDF format
- Recordings will be available for viewing for the next 2 months
- Certificate: All participants will receive a participation certificate.
Requirements
- Organizer: Spreading Knowledge, Maharashtra Times Culture Club, and Joshi-Bedekar College, Thane
- Start Date: From 14th June 2025
- Duration: 1.5 months
- Days: Monday to Friday
- Time: 8:15 PM to 9:15 PM
- Online Platform: Live on Zoom
- WhatsApp Group: A WhatsApp group for participants will be created on the morning of 14th June
- Study Material: All participants will be provided notes in PDF format
Leave a Review
सुंदर शिकवणी
दासबोधाचा आणि मनाच्या श्लोकांचा स्प्रेडींग नॉलेज चा कोर्स केला होता. खोप सुंदर शिकवणी आणि आणि उत्तम management धन्यवाद
well organized
I have attended Ved ani Upnishade course… very well managed and well organized.. all the best spreading knowledge
