समर्थ रामदासांचे श्रीराम आणि हनुमान (व्यक्ती, विचार आणि तत्त्वज्ञान)
-
LevelIntermediate
-
Total Enrolled3
-
Duration5 hours
What I will learn?
- श्रीराम व्यक्तिमत्त्व आणि चरित्र
- समर्थ रामदासांचे श्रीरामतत्त्व
- हनुमान व्यक्तिमत्त्व आणि चरित्र
- समर्थ रामदासांचे हनुमान तत्त्व
- श्रीराम आणि हनुमानाचे समकालीन महत्त्व
Course Information
आयोजक : स्प्रेडींग नॉलेज
ऑनलाईन स्थळ : झूम वर लाईव्ह
Whatsapp ग्रुप : २६ मार्चला सकाळी सहभागकर्त्यांचा एक WhatsApp ग्रुप तयार केला जाईल.
अभ्यास साहित्य : सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
प्रमाणपत्र : सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
मार्गदर्शक : प्रा.डॉ.विमुक्ता राजे
कार्यशाळेविषयी थोडेसे
भारतीय संस्कृती आणि परंपरेत श्रीराम आणि हनुमान यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. श्रीराम हे आदर्श पुरुष, आदर्श राजा आणि धर्मनिष्ठ जीवनमूल्यांचे प्रतीक मानले जातात, तर हनुमान हे भक्ती, पराक्रम, निष्ठा आणि सेवाभाव यांचे सर्वोच्च उदाहरण आहेत. भारतीय जनमानसात या दोन्ही दैवतांचे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून ते सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक जीवनमूल्यांचे प्रेरणास्थान आहे.
इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता, समर्थ रामदासांनी स्वराज्य उभारणीच्या काळात श्रीराम आणि हनुमान या दैवतांना विशेष महत्त्व दिले.
समर्थ रामदासांनी समाजाला संघटित करण्यासाठी आणि स्वराज्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी राम आणि मारुती उपासनेचा प्रभावी वापर केला.
राम तत्त्व म्हणजे धर्म, संयम, आदर्श नेतृत्व आणि कर्तव्यपालनाची शिकवण देणारे तत्त्वज्ञान; तर हनुमान तत्त्व म्हणजे निष्ठा, पराक्रम, सेवाभाव आणि अटळ श्रद्धेचे प्रतीक होय. या दोन्ही तत्त्वांचा अभ्यास केल्यास भारतीय जीवनदृष्टी, राष्ट्रचिंतन आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्वपूर्ण पैलू समजून येतात.
आजच्या वेगवान आणि मूल्यसंकटाच्या काळात श्रीराम आणि हनुमान यांच्या तत्त्वांचा अभ्यास अधिक आवश्यक ठरतो. त्यांच्या विचारांमधून व्यक्तीला जीवनमूल्यांची दिशा मिळते, तर समाजाला एकात्मता, धैर्य आणि सकारात्मक राष्ट्रदृष्टीची प्रेरणा मिळते.
याच पार्श्वभूमीवर श्रीराम नवमी आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त एक विशेष अभ्यासक्रम आयोजित करण्यात येत आहे.
कार्यशाळेचा अभ्यासक्रम
- श्रीराम व्यक्तिमत्त्व आणि चरित्र
कर्तव्यनिष्ठा,धर्मपालन,रामचरित्र महत्वाचे प्रसंग,श्रीराम व्यक्तिमत्त्व, युगपुरुष, आदर्श राजा, जीवनमूल्य.
- समर्थ रामदासांचे श्रीरामतत्त्व
रामभक्ती, समर्थांच्या रामाचे वेगळेपण, शौर्य पराक्रमी राम, राष्ट्रनिर्मितिकार राम, आदर्श राम, समर्थ साहित्यातील राम, स्वराज्य काळातील रामभक्तीचे महत्त्व.
- हनुमान व्यक्तिमत्त्व आणि चरित्र
चरित्र, भारतीय संस्कृतीतील स्थान, हनुमानाचे व्यक्तिमत्त्व , हनुमानाचे गुण, हनुमानाचे सामाजिक महत्त्व, हनुमानाची भक्ती, हनुमानाचे नेतृत्व.
- समर्थ रामदासांचे हनुमान तत्त्व
रामभक्ती, समर्थांच्या हनुमानाचे वेगळेपण, दासमारुती, वीरमारुती, शक्ति बुध्दी युक्तीचे प्रतीक, संघटक, स्वराज्य काळात हनुमानाचे महत्त्व, समर्थ साहित्यातील हनुमान.
- श्रीराम आणि हनुमानाचे समकालीन महत्त्व
श्रीराम नेतृत्व, प्रशासन, नैतिकता, मानसिक शक्ती, सावधपणा, रणनिती, व्यवस्थापन तत्त्वे, सदाचार, कर्मयोग, संकट व्यवस्थापन, कायद्याचे राज्य.
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- WhatAapp ग्रुप : २६ मार्चला सकाळी सहभागकर्त्यांचा एक WhatsApp ग्रुप तयार केला जाईल
- अभ्यास साहित्य : सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील
- प्रमाणपत्र : सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल
Requirements
- दिनांक : दिनांक २६ मार्च पासून
- कालावधी : ५ दिवस (२६,२७,३१ मार्च आणि १,२ एप्रिल)
- दिवस : गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार
- वेळ : सायंकाळी ८:१५ ते ९:१५
- ऑनलाईन स्थळ : झूम वर लाईव्ह
- मार्गदर्शक : प्रा.डॉ.विमुक्ता राजे
- शुल्क : रुपये ७५० फक्त
Target Audience
- 15 Years and Above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
