Story Telling / Narration (मराठी अभिवाचन)
-
LevelAll Levels
-
Duration6 hours
-
Last UpdatedApril 9, 2025
What I will learn?
- अभिनय आणि भावस्पर्शी वाचन यातील फरक
- आवाजाच्या माध्यमातून भावना प्रभावीपणे व्यक्त कशा कराव्यात
- संवाद आणि ऐतिहासिक पात्रांची भूमिका सादर करण्याच्या तंत्रज्ञान
- श्वासावर नियंत्रण आणि आवाजामधील चढ-उतार यांचे महत्त्व
- उच्चार आणि बोलण्याची स्पष्टता कशी सुधारावी
- भावनांना आणि आवाजातील अभिव्यक्तींना प्रभावीपणे कसे जोडावे
- श्रोत्यांना कसे गुंतवून ठेवावे आणि प्रभावित करावे
- डबिंग, कथाकथन व व्हॉइस-ओव्हरसाठी आवश्यक कौशल्ये
- रेडिओ प्रेझेंटर्स आणि पब्लिक स्पीकर्स वापरत असलेली तंत्रे
- नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना उपयोगी प्रात्यक्षिक सराव
Course Information
अभिनय आणि वाचन यातली सीमारेषा म्हणजे अभिवाचन..
एखादी कथा, नाटक किंवा लेख वाचताना आपसूकच त्या कथेतल्या, नाटकांतल्या पात्रांचा आवाज आपल्याला ऐकू येतो..
किंवा लेख वाचताना लेखकाची त्यामागची भावना आपल्याला जाणवते..
पण मग ते हुकमी कसं सादर करायचं??? लेखकाने लिहिलेलं मला आवाजाने तितक्याच उत्कट
भावनेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल का?? नाटकांमधले संवाद एकट्यानेच कसे सादर करायचे?,
ऐतिहासिक कथेतलं पात्र फक्त आवाज वापरून कसं सादर करायचं?… रंगमंच्यावर अभिनय
करणारी व्यक्तीच फक्त उत्तम अभिवाचन करू शकते का? की आपणही असा प्रयत्न करू
शकतो?…..आपल्याला असे अनेक प्रश्न नेहमीच पडतात….तर त्याचं उत्तर असं की….
आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक लय असते, उच्चार सुस्पष्ट करण्याकडे कल असतो.. फक्त आपण
करीत असलेल्या वाचनाला…श्वासाच्या जागा निश्चित करून, आवाज शास्त्रातले काही नियम
सांभाळून,तसंच योग्य आणि सयंमीत भावनांची जोड दिली गेली तर वाचन नक्कीच
“अभिवाचन “होऊ शकतं.
शब्दांचे उच्चार योग्य कसे करावेत ? बोलताना कोणती काळजी घ्यावी?
भावार्थ आणि वाचिक अभिनय कसा करावा ? संवाद कसा साधावा ?या सगळ्यांच्या उत्तरासाठी ..
अभिनय, डबिंग, कथाकथन , वक्तृत्व ,रेडिओ, व्हॉइस ओव्हर,नाटक, सिनेमा आदी आवाजाच्या
दुनियेत करियर करणाऱ्या सगळ्यांसाठी उपयुक्त अशी ऑनलाईन कार्यशाळा…
वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांसहित
Instructors
Vrinda Dabholkar
English Description
The fine line between acting and reading aloud is called story telling or narration.
When we read a story, play, or article, we naturally hear the voices of the characters or feel the emotions behind the words. But how do we present it effectively? Can we bring the writer’s emotions to life through our voice? How can we perform dialogues alone or portray a historical character using only voice? Do only stage actors excel at expressive reading, or can anyone develop this skill?
The answer is simple. Everyone has a natural rhythm and clarity in pronunciation. If we control our breathing, follow voice modulation techniques, and express emotions correctly, our reading can turn into expressive reading.
This workshop is designed for aspiring actors, dubbing artists, storytellers, public speakers, radio presenters, voice-over artists, theater performers, and film professionals. It will teach:
- How to pronounce words correctly
- Essential speech and voice techniques
- How to add emotions and vocal expressions
- How to engage the audience effectively
This is a must-attend workshop for anyone looking to build a career in acting, dubbing, storytelling, public speaking, radio, theater, or voice-over work.
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher
Requirements
- Venue: Zoom (Online)
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
Target Audience
- 12 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
