Sanskrit Language Level 1
-
LevelAll Levels
-
Duration25 hours
What I will learn?
- संस्कृत भाषेचा इतिहास आणि तिचे महत्त्व
- संस्कृत अचूक उच्चारांसह कसे वाचावे
- मूलभूत संस्कृत संभाषण कौशल्ये आणि वाक्यरचना
- काळ, नामे, सर्वनामे, विशेषणे आणि क्रियापदे समजून घेणे
- संस्कृतमध्ये लिंग, शब्द, प्रत्यय आणि शब्दनिर्मिती शिकणे
- वस्तू, प्राणी, स्थळे आणि नावे यावरील शब्दसंग्रह वाढवणे
- अमरकोशाची ओळख – संस्कृत शब्दकोश
- संस्कृतमधील विविध वाक्यरचनांची समज
- महत्त्वाच्या शब्दसंग्रहाच्या साहाय्याने संवाद सराव
- अथर्वशीर्ष वाचन, लेखन आणि उच्चाराचे प्रशिक्षण
Course Information
देवभाषा म्हणून ओळखली जाणारी संस्कृत हि अनेक आधुनिक भाषांची जननी म्हणून समजली जाते.अनेक वर्षांपूर्वी भारतीय भूमीमध्ये जन्मलेली संस्कृत हि आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग आहे.संस्कृत भाषेला एक ऐतिहासिक,सांस्कृतिक, भौगोलिकआणि वैचारिक अशी एक बैठक आहे.आपले बरेचसे धार्मिक ग्रंथ,स्तोत्र,पुस्तके बहुतांशी संस्कृत भाषेतच लिहिले गेले आहेत. अशी हि अती प्राचीन भाषांपैकी असलेली एक असलेली भाषा शिकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
या अनुषंगाने घेतल्या जाणाऱ्या संस्कृत कार्यशाळेत आपल्याला संस्कृत भाषा शिकवली जाईल.योग्य उच्चारांसह वाचन करणे,संवाद साधणे,लिखाण करणे आदी गोष्टींसह संस्कृत व्याकरण देखील आपण शिकणार आहोत , मर्यादित जागा असल्याने वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल.
वाचाशुद्धी साठी, अनेक भाषा जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषा अत्यंत उपयोगी आहे. तसेच ती एक भारतीय संस्कृतीचा गाभा असल्याने संस्कृती,धर्म ,धार्मिक ग्रंथ इत्यादींच्या वाचनासाठी आणि ते समजून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
Instructors
Sayali Deshpande / Sudip Joshi
Download Syllabus: 🗎 संस्कृत वर्ग माहिती
Demo Lecture
कार्यशाळा
१. संस्कृत भाषा ओळख इतीहस आणि त्याचा प्रचार प्रसार
२. संस्कृत संभाषण
३. संस्कृतमधील काळ
४. संस्कृत नाम,सवर्नाम, विशेषण क्रियापद यांची ओळख
५. संस्कृत लिंग , शब्द, प्रत्यय, शब्दरचना यांची ओळख
६. शब्दसंग्रह –वस्तु, प्राणी,ठिकाणे, नाम, यांची माहिती
७. अमरकोश
८. विधानार्थी वाक्य,प्रश्नाथर्क वाक्य,उद्गारवाचक वाक्य
९. संभाषणाला उपयुक्त शब्दसंग्रहाचा वापर कसा करायचा अभ्यासक्रम
१०. मम परिचय – स्वतःचा परिचय संस्कृतमध्ये कसा सांगायचा
११. लहान लहान व्यावहारिक वाक्ये तयार करणे
१२. अथर्वशीर्ष- वैदिक साहित्याची थोडक्यात माहिती,,ओळख,रचना, शब्द,प्रत्यय,व्याकरण
१३. अथवर्शीषर् याचा अथार्सकट आणी उच्चारांसकट प्रशिक्षण
१४. संस्कृत लिखाण,वाचन,संभाषण प्रशिक्षण
English Description
Sanskrit, known as the “language of the gods,” is the mother of many modern languages. It originated in ancient India and remains an inseparable part of Indian culture. Many religious scriptures, hymns, and classical texts were originally written in Sanskrit. This course offers a unique opportunity to learn one of the world’s oldest languages.
In this Sanskrit workshop, participants will learn reading with correct pronunciation, conversation skills, writing, and Sanskrit grammar. Due to limited seats, personalized guidance will be provided.
Sanskrit is highly useful for improving pronunciation, learning multiple languages, and understanding Indian culture, religion, and ancient texts.
Syllabus
- Introduction to Sanskrit language – History and its propagation
- Sanskrit conversation
- Tenses in Sanskrit
- Introduction to Sanskrit nouns, pronouns, adjectives, and verbs
- Introduction to Sanskrit gender, words, suffixes, and word formation
- Vocabulary – Information about objects, animals, places, and names
- Amarakosha (Sanskrit lexicon)
- Declarative, interrogative, and exclamatory sentences in Sanskrit
- Practical usage of vocabulary for conversation
- Mamma Parichaya – How to introduce oneself in Sanskrit
- Formation of short and practical sentences
- Atharvashirsha – Brief introduction to Vedic literature, structure, words, suffixes, and grammar
- Training in the meaning and correct pronunciation of Atharvashirsha
- Training in Sanskrit writing, reading, and conversation)
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- अभ्यास साहित्य - सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
- प्रमाणपत्र - सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र PDF स्वरुपात दिले जाईल.
Requirements
- आयोजक - स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
- दिनांक - दिनांक २८ जानेवारी २०२६ पासून
- कालावधी - साधारण २ महिने
- दिवस - दर सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार
- वेळ - सायंकाळी ८:१५ ते ९:१५
- ऑनलाईन स्थळ - झूम वर लाईव्ह
- Whatsapp ग्रुप - २७ जानेवारीला सकाळी सहभागकर्त्यांचा एक Whatsapp ग्रुप तयार केला जाईल
- शुल्क : रुपये २५०० फक्त
- एकूण तास : २५
Target Audience
- 15 years and above
Leave a Review
रोजच्या वर्गातच इतकी छान तयारी करून घेतली जायची की बऱ्याच गोष्टी वर्गातच पाठ होऊन जायच्या
खूप छान.रोजच्या वर्गातच इतकी छान तयारी करून घेतली जायची की बऱ्याच गोष्टी वर्गातच पाठ होऊन जायच्या.सायली मॅडम आणि सुदीप सर यांच्यासारखे अतिशय उत्तम शिक्षक आम्हाला लाभले त्याबद्दल आपले आभार.पुढच्या कोर्सला यायची इच्छा होती परंतु वेळेअभावी शक्य होतं नसल्याने क्षमस्व.
मला संस्कृत भाषा शिकताना खूप आनंद झाला
मला संस्कृत भाषा शिकताना खूप आनंद झाला.माझा परिचय संस्कृत भाषेत देता आला याचा ही आनंद वाटतो.सायली मॅडम आणि सुदीप सर यांनी उत्तम शिकविले व उत्तम मार्गदर्शन केले. त्यांचे खूप खूप धन्यवाद.
आत्मविश्वास वाढला
खूप छान कोर्स. दोघांनी तळमळीने शिकवल्यामुळे विषय समजणे आणि लक्षात रहाणे सहज शक्य झाले. आत्मविश्वास वाढला आहे. खूप मनःपूर्वक धन्यवाद.
संस्कृत भाषेचे व्याकरण, संभाषण, व भाषेची थोरवी या वर्गातील अभ्यासांतून ज्ञात झाली
संस्कृत भाषेचे व्याकरण, संभाषण, व भाषेची थोरवी या वर्गातील अभ्यासांतून ज्ञात झाली.संस्कृत आत्मसात करण्याची रुचि उत्पन्न झाली.दोन्ही आचार्यांनी संस्कृत अतिशय ग्रहण करण्यासाठी अतिशय सहज व सुलभ केले.अत्यंत खेळीमेळीने शिकविले.शिकण्यातील आनंद पुन्हा गवसला.
Khup chaan anubhav hota
Khup chaan anubhav hota. Sanskrit shikaycha ani vachaycha confidence milala. Ek improvement hou shakte ki basic vachna sathi thoda material dilyas ajun avdel.
खूपच छान
खूपच छान . खूप दिवसांपासून वाटत होते कि मला संस्कृत कळावे आपल्या माध्यमातून ते पूर्ण झाले तोंड ओळख झाली सायली ताई सुदीप सर तसेच पौरस सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏 आपला हा प्रवास निरंतर चालू राहो ही योगेश्वरां चरणी मनापासून प्रार्थना करते🙏
Course was very nicely designed
Course was very nicely designed, so that learner can get basic knowledge of Sanskrit
तीन महिने फार उत्तम गेले
सायली ताई आणि सुदीप आचार्य दोघांनीही फार मेहनतीने वर्ग घेतले. त्यामुळे नव्याने काही गोष्टी समजल्या. तीन महिने फार उत्तम गेले, त्यामुळे हा वर्ग कधी संपत आला हे कळलंच नाही. पुन्हा नव्याने सहभागी होण्याची इच्छा आहे. धन्यवाद.
अभ्यासक्रम अजून बराच जास्त असायला हवा होता.
अभ्यासक्रम अजून बराच जास्त असायला हवा होता. संभाषण उतारे बेसिक कोर्स मध्ये असायला हवे होते.
Useful for acquiring knowledge
Useful for acquiring knowledge of our ancient culture through basic studies of Veda and puranas. improvement in voice modulation through shlok and stotras.
