Sanskrit Language Level 1

2,500.00 5,000.00

What I will learn?

  • संस्कृत भाषेचा इतिहास आणि तिचे महत्त्व
  • संस्कृत अचूक उच्चारांसह कसे वाचावे
  • मूलभूत संस्कृत संभाषण कौशल्ये आणि वाक्यरचना
  • काळ, नामे, सर्वनामे, विशेषणे आणि क्रियापदे समजून घेणे
  • संस्कृतमध्ये लिंग, शब्द, प्रत्यय आणि शब्दनिर्मिती शिकणे
  • वस्तू, प्राणी, स्थळे आणि नावे यावरील शब्दसंग्रह वाढवणे
  • अमरकोशाची ओळख – संस्कृत शब्दकोश
  • संस्कृतमधील विविध वाक्यरचनांची समज
  • महत्त्वाच्या शब्दसंग्रहाच्या साहाय्याने संवाद सराव
  • अथर्वशीर्ष वाचन, लेखन आणि उच्चाराचे प्रशिक्षण

Course Information

देवभाषा म्हणून ओळखली जाणारी संस्कृत हि अनेक आधुनिक भाषांची जननी म्हणून समजली जाते.अनेक वर्षांपूर्वी भारतीय भूमीमध्ये  जन्मलेली संस्कृत हि आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग आहे.संस्कृत भाषेला एक ऐतिहासिक,सांस्कृतिक, भौगोलिकआणि वैचारिक अशी एक बैठक आहे.आपले बरेचसे धार्मिक ग्रंथ,स्तोत्र,पुस्तके बहुतांशी संस्कृत भाषेतच लिहिले गेले आहेत. अशी हि अती  प्राचीन भाषांपैकी असलेली एक असलेली भाषा शिकण्याची संधी आपल्याला  मिळणार आहे.

या अनुषंगाने घेतल्या जाणाऱ्या संस्कृत कार्यशाळेत आपल्याला संस्कृत भाषा  शिकवली जाईल.योग्य उच्चारांसह वाचन करणे,संवाद साधणे,लिखाण करणे आदी गोष्टींसह संस्कृत व्याकरण देखील आपण शिकणार आहोत , मर्यादित जागा असल्याने वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल. 

वाचाशुद्धी साठी, अनेक भाषा जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषा अत्यंत उपयोगी आहे. तसेच ती एक भारतीय संस्कृतीचा गाभा असल्याने संस्कृती,धर्म ,धार्मिक ग्रंथ इत्यादींच्या वाचनासाठी आणि ते समजून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

Instructors

Sayali Deshpande / Sudip Joshi

Download Syllabus: 🗎 संस्कृत वर्ग माहिती

Demo Lecture

कार्यशाळा

१. संस्कृत भाषा ओळख इतीहस आणि त्याचा प्रचार प्रसार

२. संस्कृत संभाषण

३. संस्कृतमधील काळ

४. संस्कृत नाम,सवर्नाम, विशेषण क्रियापद यांची ओळख

५. संस्कृत लिंग , शब्द, प्रत्यय, शब्दरचना यांची ओळख

६. शब्दसंग्रह –वस्तु, प्राणी,ठिकाणे, नाम, यांची माहिती

७. अमरकोश

८. विधानार्थी वाक्य,प्रश्नाथर्क वाक्य,उद्गारवाचक वाक्य

९. संभाषणाला उपयुक्त शब्दसंग्रहाचा वापर कसा करायचा अभ्यासक्रम

१०. मम परिचय – स्वतःचा परिचय संस्कृतमध्ये कसा सांगायचा

 ११. लहान लहान व्यावहारिक वाक्ये तयार करणे

१२. अथर्वशीर्ष- वैदिक साहित्याची थोडक्यात माहिती,,ओळख,रचना, शब्द,प्रत्यय,व्याकरण

 १३. अथवर्शीषर् याचा अथार्सकट आणी उच्चारांसकट प्रशिक्षण

 १४. संस्कृत लिखाण,वाचन,संभाषण प्रशिक्षण

English Description

Sanskrit, known as the “language of the gods,” is the mother of many modern languages. It originated in ancient India and remains an inseparable part of Indian culture. Many religious scriptures, hymns, and classical texts were originally written in Sanskrit. This course offers a unique opportunity to learn one of the world’s oldest languages.

In this Sanskrit workshop, participants will learn reading with correct pronunciation, conversation skills, writing, and Sanskrit grammar. Due to limited seats, personalized guidance will be provided.

Sanskrit is highly useful for improving pronunciation, learning multiple languages, and understanding Indian culture, religion, and ancient texts.

Syllabus
  1. Introduction to Sanskrit language – History and its propagation
  2. Sanskrit conversation
  3. Tenses in Sanskrit
  4. Introduction to Sanskrit nouns, pronouns, adjectives, and verbs
  5. Introduction to Sanskrit gender, words, suffixes, and word formation
  6. Vocabulary – Information about objects, animals, places, and names
  7. Amarakosha (Sanskrit lexicon)
  8. Declarative, interrogative, and exclamatory sentences in Sanskrit
  9. Practical usage of vocabulary for conversation
  10. Mamma Parichaya – How to introduce oneself in Sanskrit
  11. Formation of short and practical sentences
  12. Atharvashirsha – Brief introduction to Vedic literature, structure, words, suffixes, and grammar
  13. Training in the meaning and correct pronunciation of Atharvashirsha
  14. Training in Sanskrit writing, reading, and conversation)

Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)

Material Includes

  • अभ्यास साहित्य - सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
  • प्रमाणपत्र - सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र PDF स्वरुपात दिले जाईल.

Requirements

  • आयोजक - स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
  • दिनांक - दिनांक २८ जानेवारी २०२६ पासून
  • कालावधी - साधारण २ महिने
  • दिवस - दर सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार
  • वेळ - सायंकाळी ८:१५ ते ९:१५
  • ऑनलाईन स्थळ - झूम वर लाईव्ह
  • Whatsapp ग्रुप - २७ जानेवारीला सकाळी सहभागकर्त्यांचा एक Whatsapp ग्रुप तयार केला जाईल
  • शुल्क : रुपये २५०० फक्त
  • एकूण तास : २५

Target Audience

  • 15 years and above
Leave a Review

Course content was very crisp and clear

Course content was very crisp and clear. Both facilities, Sudeep sir and Sayali madam were very friendly and helpful.

Dr Sunil Sudhakar Sawai

संस्कृत भाषेशी माझा स्पर्श हरवला होता. तो पुन्हा स्थापित झाला

संस्कृत भाषेशी माझा स्पर्श हरवला होता. तो पुन्हा स्थापित झाला आणि सोपे संभाषण करण्याचा विश्वास आला. धन्यवाद.

विवेक विलास जोशी.

दोन्ही शिक्षकांनी फारच छान शिकवलं

दोन्ही शिक्षकांनी फारच छान शिकवलं. मी वेळेच्या कारणामुळे संस्कृत प्रगत अभ्यासक्रम ह्यावेळी करणार नाही, भविष्यात करायची इच्छा आहे.

मकरंद मधुकर भागवत

Teachers khup changlya prakare samjawatat

Teachers khup changlya prakare samjawatat

Pradnya Vivek Palande

संस्कृत चा हा अभ्यासक्रम माहितीपूर्ण आणि उपयोगी होता

संस्कृत चा हा अभ्यासक्रम माहितीपूर्ण आणि उपयोगी होता. दोन्ही शिक्षकांनी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवले. त्यामुळे संस्कृत भाषेची छान ओळख झाली आणि प्राथमिक ज्ञान मिळाले

डॉ. राजेश देशपांडे

छान अनुभव

छान अनुभव. संस्कृत भाषेतील बारकावे समजून आले.

सौ. रचना विलणकर

कोर्स चांगला आहे

कोर्स चांगला आहे पण मला जरा प्राथमिक वाटला. आता advanced कोर्स मला जास्त उपयोगी वाटेल.

Hemant Kulkarni

Overall course is really good

Overall course is really good 👍, actually i am very fresh for this course so little bit difficult for me. But I will try for better. All teachers are very good.

Sau Uma Sanjiv Rale

The course was very helpful

The course was very helpful and good. Glad to know this beautiful language.

Gargi Deepak Rahane

आयोजन आणि शिकवणे खुप उत्तम

खुप छान होता आयोजन आणि शिकवणे खुप उत्तम.मे महिन्या नंतर ऍडव्हान्स कोर्स ची batch असेल तर येईल तेव्हा ग्रुप वर कळवावे

प्रवीण पुरुषोत्तम जोशी