सत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या गोष्टी
- आयुष्यातील बदलांना कसे सामोरे जावे
- वृद्धकाळातील एकटेपणा कसा स्वीकारावा
- स्मृतिभ्रंश / विसराळूपणा यावर उपाय
- नवीन पिढी आणि जगाशी कसे जुळवून घ्यावे
- दुःखाला सामोरे कसे जावे
- राग आणि चिडचिड नियंत्रणाचे उपाय
- जीवनसाथीचा किंवा जवळच्या व्यक्तींचा मृत्यू याला सामोरे कसे जावे तसेच मृत्यूविषयी समजूत
- अपेक्षा, अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग
- नात्यानात्यातील संवाद आणि सामंजस्य
- याशिवाय एक आनंदी आणि सुखमय जीवन कसे जगावे
अशा अनेक आणि तुमच्या वैयक्तिक समस्यांविषयी मार्गदर्शन
सत्राबद्दल अधिक महिती
भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाचे ४ आश्रम सांगितले आहेत – ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. त्यात वानप्रस्थाश्रम म्हणजे ज्यात ५०-५५ वर्षानंतर लोक संसारातून निवृत्ती घेत असत. आत्ता आधुनिक युगात देखील साधारण ५०-५५ वर्षानंतर लोक निवृत्त होतात, आपला सगळा संसार हा आपल्या मुलांच्या हातात सोपवतात आणि एका नवीन दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतात.
मात्र बऱ्याच वेळा ही दुसरी इनिंग जरा अडखळत सुरु होते. याच एक कारण म्हणजे वेगाने बदलत असलेलं जग आणि कमी झालेला नात्यानात्यामधील संवाद.
या वयात आयुष्यात खूप मोठे बदल होतात. संसारामधील आपला हातभार कमी होतो, जे निर्णय आपण घ्यायचो तेच निर्णय आता आपली पुढची पिढी घेते. आणि बऱ्याचदा अशा वेळेस आपली मते विचारात घेतली जात नाहीत. वेगाने बदलत्या दुनियेत आपण कुठेतरी मागे पडत जातो. आपल्या अपेक्षा आणि समोर घडणाऱ्या गोष्टी यात तफावत वाढत जाते. नवीन पिढीशी गोष्टींची जुळवून घेणे कधी कधी कठीण जाते. यातून बऱ्याचदा राग आणि चिडचिड वाढते. निवृत्तीनंतर काय करावं हा प्रश्न देखील उभा राहतो. या सगळ्यात बरेचदा जवळची माणसे गेल्यामुळे एकटेपण येतो.
आयुष्याच्या या टप्यावर बदलांना सामोरे जाऊन एक आनंदी आणि सुखमय जीवन कसे जगावे? स्मृतिभ्रंश किंवा विसराळूपणा यावर उपाय कसे शोधावे? नात्यानात्यांमधील संवाद कसा वाढवावा? जीवनसाथीच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूला सामोरे कसे जावे? दुःखाला सामोरे कसे जावे? नवीन पिढीशी कसे जुळवून घ्यावे? राग आणि चिडचिड यावर उपाय कसे शोधावेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कार्यशाळेत मिळतील. तसेच आपल्या व्यक्तिगत समस्यांचे (नाव गोपनीय ठेऊन) निराकारण देखील केले जाईल.
वृद्धापकाळ हे एक दुसरे बालपण असते असे म्हंटले जाते, मात्र हे बालपण खूप जास्त अनुभवांतून आलेले असल्याने या वयोगटातील समस्यांची उत्तरे मिळण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकांचीच गरज असते.






Reviews
There are no reviews yet.