आयोजक : स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
दिनांक : गुरुवार, १४ मे २०२६ पासून
कालावधी : साधारण १.५ महिने
दिवस : दर मंगळवार बुधवार आणि गुरुवार
वेळ : सायंकाळी ८:१५ ते ९:१५
ऑनलाईन स्थळ : झूम वर लाईव्ह
अभ्यास साहित्य : सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
शुल्क : रुपये १७५० फक्त
प्रमाणपत्र : सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र PDF स्वरुपात दिले जाईल.
प्रशिक्षिका : वरदा ठोसर – ढापरे
मोडी लिपी विषयी थोडेसे
मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक प्राचीन आणि वेगवान लिपी आहे. ही लिपी विशेषतः प्रशासन, व्यवहार आणि दैनंदिन लेखनासाठी वापरली जात असे. देवनागरीपेक्षा मोडी लिपी अधिक जलद लिहिता येते, त्यामुळे ती लेखनिक आणि कारकुनांमध्ये खूप लोकप्रिय होती.
मोडी लिपीचा वापर मुख्यतः मराठा साम्राज्य काळात मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः पेशवा काल मध्ये शासनाचे सर्व कामकाज मोडी लिपीत चालत असे.सरकारी कागदपत्रे, हुकुमनामे, जमीन व्यवहार, कर नोंदी इत्यादी सर्व लेखन मोडी लिपीत होत असे.तसेच महाराष्ट्राच्या आसपासच्या प्रदेशांत सुद्धा मोडी होती. कानडी, गुजराथी, उर्दू भाषेतही हे दस्तऐवज़ मिळतात.या लिपीमुळे प्रशासन अधिक जलद आणि कार्यक्षम झाले. आजच्या आधुनिक काळात मोडी लिपीचा वापर कमी झाला असला तरी तिचे महत्त्व अजूनही टिकून आहे.
जुन्या दस्तऐवजांचे वाचन आणि अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी आवश्यक आहे. इतिहासकार आणि संशोधक मोडी लिपी शिकून मराठा काळातील माहिती शोधतात. ही लिपी आपल्या मराठी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. मोडी लिपी ही केवळ एक लेखन पद्धती नसून, ती आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक अमूल्य वारसा आहे.
आजच्या डिजिटल युगातही तिचे जतन आणि अभ्यास करणे खूप गरजेचे आहे, कारण त्यातून आपल्याला आपल्या भूतकाळाची सखोल माहिती मिळते.
मोडी लिपी प्राथमिक आणि प्रगत अभ्यासक्रम
- मोडी लिपीविषयी थोडेसे
- स्वर व्यंजने
- चौदाखडी
- चौदाखडी
- जोडाक्षरे
- जोडाक्षरे अंक
- र आणि मात्रा प्रकार
- उतारा वाचन
- शब्दसंक्षेप
- पत्रवाचन
- रेघी
- कालगणना
- पत्र/मायने वाचन
- पत्रवाचन
- लिप्यंतर कसे करावे??
मोडी लिपीचा वर्तमानकाळातील उपयोग
- जुन्या कागदपत्रांचे (पेशवा काळातील, जमीन नोंदी, हुकुमनामे) वाचन करण्यासाठी
- पीएचडी, एम.फिल., संशोधन प्रकल्पांसाठी
- इतिहास विषयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त
- राज्य अभिलेखागार, संग्रहालये येथे जुने दस्तऐवज वाचण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते
- जमीन अभिलेख (7/12, फेरफार) समजून घेण्यासाठी
- हेरिटेज प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी
- मोडी लिपीचे वर्ग (ऑनलाईन/ऑफलाईन) घेऊ शकतात
- शाळा/कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर
- जुने मोडी दस्तऐवज देवनागरी/इंग्रजीत रूपांतर (लिप्यंतर)
- रिसर्च स्कॉलर्स, लेखक, डॉक्युमेंटरी निर्मात्यांसाठी काम
- ऐतिहासिक चित्रपट/सीरियल्ससाठी रिसर्च
- यूट्यूब, ब्लॉग, इंस्टाग्रामवर ऐतिहासिक कंटेंट तयार करणे






Reviews
There are no reviews yet.