आयोजक : स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
दिनांक : दिनांक ५ ऑगस्ट २०२६ पासून
कालावधी : साधारण १.५ महिने
दिवस : दर सोमवार ते शुक्रवार
वेळ : सायंकाळी ८:१५ ते ९:१५
ऑनलाईन स्थळ : झूम वर लाईव्ह
Whatsapp ग्रुप : ५ ऑगस्टला सकाळी सहभागकर्त्यांचा एक whatsapp ग्रुप तयार केला जाईल.
अभ्यास साहित्य : सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
शुल्क : रुपये १००० फक्त
प्रमाणपत्र : सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र PDF स्वरुपात दिले जाईल.
मार्गदर्शक : सौ.सायली अक्षय देशपांडे
अभ्यासक्रमाविषयी थोडेसे
भारतीय वैदिक परंपरेत वेद,ब्राह्मण,आरण्यक आणि उपनिषदे या ज्ञाननिधीचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात आपल्या रोजच्या जीवनात धार्मिक व आध्यात्मिक कार्यात यातील “सूक्त” आपण ऐकत असतो म्हणत असतो. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे दोन सूक्त आहेत. १.श्रीसूक्त २.पुरुषसूक्त. याशिवाय चारही वेदांमध्ये अनेकविध सूक्तांच्या रचना आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगाने चारही वेदांतील निवडक सूक्त आपण या अभ्यासक्रमात अभ्यासणार आहोत.
अभ्यासक्रम
- अग्निसूक्तम् (१/१ ऋषि – मधुच्छंदा, देवता – अग्नि, छंद- गायत्री)
- इंद्रसूक्तम् (२/१२ ऋषि – गृत्स्यमद, देवता – इंद्र, छंद – त्रिष्टुभ)
- शिवसंकल्पसूक्त (३४/१-६ ऋषि – अगस्त्य, देवता- मन, छंद- त्रिष्टुभ)
- राष्ट्राभिवर्धन सूक्त (१/२९ ऋषि – वशिष्ठ, देवता- ब्रह्मणस्पति, छंद – अनुष्टुभ)
- श्रीसूक्तम् ( पाचवे मंडल,ऋषि – आनंद कर्दम चिक्लित, छंद १-३ अनुष्टुभ, ४- बृहती,५-६ त्रिष्टुभ, ७-१४ अनुष्टुभ)
- पुरुषसूक्तम् ( १०/९० ऋषि- नारायण, देवता- पुरुष, छंद- अनुष्टुभ)
वर्गाची मुख्य वैशिष्ट्ये
- सूक्तांचे योग्य उच्चारण, पठण आणि अर्थ
- कठीण शब्दांचे अर्थ
- सूक्तांचे रचयिता ऋषी आणि यांची माहिती
- योग्य पठण कसे करावे याचे मार्गदर्शन
- वैयक्तिक मार्गदर्शन
- रेकोर्डिंग २ महिने पाहण्याची सुविधा
- सगळ्या नोट्स PDF मध्ये उपलब्ध






Reviews
There are no reviews yet.